बाबासाहेब. . .नक्की वाचा !

बाबासाहेबांची त्रिसूत्री
शिका, संघटीत राहा आणि संघर्ष करा. .

खुप काही साध्य करु शकू. .
शिक्षण घेऊन . . .
फक्त पुस्तकी शिक्षण घेऊन ऊपयाेग नाही.. .
तर अभ्यासायला हवी ही व्यवस्था. .
जी वर्षानुवर्षे फक्त पुरुषी वर्चस्ववाद बिंबवत आलीय प्रत्येकीच्या मनावर.

‘ऊच्चवर्णीय’  म्हणुन
मग धर्म, जात काेणतीही असाे. . .
‘आपलं’ महत्त्व टिकावं
यासाठी जातीव्यवस्था बळकट केली गेलीय. .. .

जातीव्यवस्था. .
त्याच्या जाेडीला पुरुषी वर्चस्ववाद. .
हे प्रत्येकीने अभ्यासावं. .
स्वतः प्रयत्नपुर्वक अभ्यासावं. .

खुप छाेट्या छाेट्या बेड्या
पावलाेपावली तयार ठेवल्यात. .
या व्यवस्थेने. . .

त्या जर ताेडायच्या असतील. .
तर बाबासाहेबांच्या परिभाषेत सर्वप्रथम ‘शिक्षण’ घेण्याशिवाय पर्याय नाही.

कुठेही राहा. .
खेड्यात, शहरात, गल्ली बाेळ्यात. .
पण शिकण्याचा अट्टाहास साेडू नका. .
विराेध हाेईल, पण ताे हेका साेडू नका. .

कारण ही पुरुषी दमन व्यवस्था
ताेडण्याचा एकमेव उपाय. .
शिक्षण
याेग्य शिक्षण. .
डाेळे ऊघडणारं शिक्षण. .
ही व्यवस्था समजून सांगणारं शिक्षण.
जे प्रगतीशील विचारांकडे नेईल.
जे तुमचा ‘माणूस’ म्हणुन विचार करेल.

अश्विनी सुर्वे

Facebook Comments

Category:

Share: