शाळा

School Get-Together

आठवते का शाळेमध्ये घडलेली ती प्रत्येक बात
पहिल्या घंटेने व्हायची दिवसाची सुरूवात.

प्रत्येक अर्ध्या तासागणिक त्या घंटेचा नाद वर्गभर घुमायचा
शिक्षकांच्या स्वागतासाठी “एक साथ नमस्ते” असा एकच सुर असायचा

शेवटच्या बाकावर बसुन धमाल करणारे तर प्रत्येक वर्गात पाहिले,
पण पहिल्या बाकावर बसुनही धमाल करु शकतो हे प्रथमच अनुभवले.

School Group

 

आठवते का चोरुन खालेल्या चिंचा, बोरं आणि सोप
खिशामध्ये भरून आस्वाद घेत उडायची सगळ्यांची झोप

गॅदरींग मध्ये केलेल्या “ढवळ्या पवळ्या” सारख्या अस्सल मराठमोळ्या गाण्यावरचा डान्स
“चिनीमिनी चिनीमिनी धुमधडाका” असा जल्लोष करत प्रतिस्पर्ध्याला चिडवण्याचा सोडायचो नाही चान्स

प्रत्येक विषयाला सुयोग्य असे शिक्षक आणि शिक्षिका
त्यांच्या मेहनतीमुळे बदलत गेली जीवनाची मालिका

Desai Sir with group

वाघ सरांसारखे वर्गशिक्षक शिकवायचे इतिहास, नावात होती त्यांच्या जबर पण
शिकवताना भिती निर्माण होणार नाही याची नेहमीच घ्यायचे ते खबर

मराठी विषयाला होत्या मॅडम वनमाळी, बोलणं फारचं छान त्यामुळेच
कविता शिकवताना त्या हरपुन न्यायचे सगळ्यांचं भान

हिंदीला होत्या राऊत मॅडम, सगळ्यांच्या आवडीच्या
दंगामस्ती कितीही केली तरी कधी नाही ओरडायच्या

 

इंग्रजी तसा होता कठीण विषय, होत्या मॅडम डहाणुकर
व्याकरणातील बारकावे सोप्या पद्धतीने शिकवुन मार्ग केला सुकरPawar Sir

भुगोलाची खडांखडा माहीती असलेल्या मॅडम निकम
प्रत्येक विद्यार्थीनीला आदर्श वाटेल याचे जिवंत उदाहरण

सायन्स आणि गणितासाठी होत्या शेट्टे मॅडम आणि पवार सर
प्रत्येक पाॅईंट सविस्तर समजवण्याचा नेहमी असे दोघांचा भर.

चित्रकलेसारखी कला शिकवली चौगुले मॅडमनी
प्रत्येक नात्यात तसेच रंग भरुन आयुष्य झाले आनंदी
School

या आठवणींना उजाळा द्यायचं एकच कारण म्हणजे आपल्या वर्गाचं गेट टुगेदर
चला तर मग धमाल, मस्ती, मजा करुन करु सगळे कार्यक्रम सादर

Facebook Comments

Category:

Share: