साबूदाणा वडा

“तसं मला उपवास करणं तितकसं आवडत नाही पण साबूदाणा वडा खायला मिळत असेल तर कोण उपवास करणार नाही” असे प्रत्येकजण म्हणतो, पण मी उपवास असो वा नसो माझी साबूदाणा वडा खायची इच्छा झाली की ती पूर्ण करते.

साबूदाणा तसा पचायला जड त्यामुळे तो जास्तही खाऊ शकत नाही पण एखाद्या दिवशी खायला काय हरकत आहे. बरोबर ना. तर आजची रेसेपी आहे साबूदाणा वडा!

Sabudana Vada

नाव – साबूदाणा वडा

साहित्य : (चार व्यक्तींकरता)

2 वाटी साबूदाणा (८ तास भिजवलेला)
3-4 उकडलेले बटाटे
हिरवी मिरची
जिरे
तेल
मीठ (चवीनुसार)

कृती :

गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे. भिजवलेला साबूदाणा आणि उकडलेले बटाटे एकत्र करून त्यात हिरवी मिरचीचा ठेचा जिरे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व मिश्रण एकजीव करावे.  तयार झालेल्या मिश्राणाचे छोटे छोटे गोळे करून ते गरम तेलात तळून घ्यावे.

आपल्या प्रतिसादाने नवीन काही बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. आपला अभिप्राय जरूर कळवा.

 

Facebook Comments

Category:

Share: