बदल
दोन वर्षाच्या माझ्या मुलाने प्रश्न केला एक केविलवाणा,
तु ही आजारी पडायचीस् का माझ्या एवढी असताना?
सहज वाटणारा प्रश्न उत्तर देताना करायला लावतो विचार
का हल्लीची मुलं जन्मता घेऊन येतात आजार?
सासु सुनेला तर सुन पर्यावरणाला दोष देते, नक्की दोष कोणाचा?
धावपळीचं जग, पदार्थातील भेसळ की पर्यावरणातील बदलांचा?
आधीच्या स्त्रिया नव्हत्या करीअर ओरीएंटेड
चुल आणि मुल हेच दिवसभर करायच्या अटेंड
पण आता घरातील प्रत्येक मुलगी धडपडते रोजगारासाठी
हे एक कारण असु शकतं का प्रसुतीमधील बदलांवासाठी
दुसरीकडे पर्यावरणात होणार्या बदलांमुळे बळावतोय आजार
तर बाजारातल्या भेसळ पदार्थांनी जीव होतोय बेजार
म्हणतात रोजच्या आहारात फळं असणं हे एक उत्तम आहाराचं लक्षण
पण आता फळंही पिकवुन दिली जातात हे चित्र आहे विलक्षण
लहान असताना आपण आवडीने खायचो चहा चपाती
पण आता मुलांना क्रिम बिस्किट शिवाय नको काही हाती
आधी गोड लागायचं आईच्या हातचं झुणका भाकर
पण आता त्यांना हवाहवासा वाटतो पिझ्झा आणि बर्गर
आधी वर्षातुन एकदाच यायचा हाॅटेलमध्ये जाण्याचा योग
आता महिन्यातल्या एका रविवारी तरी घेतला जातो त्याचा उपभोग.
एकमेकांना दोष देण्यापेक्षा घडवुन आणला पाहिजे बदल
बदल तेव्हाच् होईल जेव्हा घेईल कोणीतरी याची दखल.
Facebook Comments