सलाम
माझा सलाम त्या घरातल्या प्रत्येक स्त्रीला
जी आहे आता मुलगी, बहिण, सासु किंवा माता
प्रत्येक नात्याचं आहे एक वेगळं महत्त्व
असावं सगळं शिस्तबद्ध हे एकच तत्व
प्रत्येक नात्यात ती मनापासुन होते एकरुप
म्हणुनच घराला मिळते आनंदी स्वरुप
मुलगी असते घराची छाया
तर आईच्या प्रेमात असते माया
सुन असते घराची शान
त्या शानचा सासु राखते मान
पण अजुनही आहे पुरुषप्रधान संस्कृती
जिथे त्यांच्या विचारांना नाही काही गती
शारीरिक अत्याचार आणि बेदम मार अजुनही करतात त्या सहन
चला तर मग संपवून टाकु या विचारांना आणि करू त्यांच दहन
Facebook Comments