ब्रेड मिनी पिझ्झा

नमस्कार मित्रांनो,

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पिझ्झा आवडतो. पण या पिझ्झ्यामध्ये एक विशेष बात आहे ती म्हणजे हा बनवण्यास अगदी सोप्पा आणि लगेच तयार होईल असा. महत्वाचे म्हणजे याचा बेस मैदाचा नसून ब्राउन ब्रेडचा उपयोग केला आहे.

नाव – मिनी पिझ्झा

साहित्य : (चार व्यक्तींकरता)

ब्राउन ब्रेड ( 1 पाकीट)
रवा (2 वाटी)
दही
1 टोमॅटो
1 कांदा
1 चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद
1 चमचा गरम मसाला
चवीपूरत मीठ
कोथिंबीर

कृती :
प्रथम एका टोपात 2 वाटी रवा घेऊन त्यात अर्धा वाटी दही घालून ते मिश्रण एकजीव करावे. मग त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करावे. आता ब्रेड चे गोल वा त्रिकोणी आकार करून घ्यावेत. एकएका स्लाइस वर तयार केलेले मिश्रण लावून एका ताटात सगळे स्लाइस तयार करून घ्यावे. गॅस वर तवा तापत ठेवावा आणि मंद आचेवर एक एक स्लाइक तव्यावर उलटा टाकावा (मिश्रण लावलेली बाजू तव्यावर याप्रमाणे). एक बाजू खरपूस झाली की पलटून दुसरी बाजू खरपूस भाजून घ्यावी. खोबर्‍याची चटणी वा सॉस सोबत सर्व्ह करावे.

आपल्या प्रतिसादाने नवीन काही बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. आपला अभिप्राय जरूर कळवा.

Facebook Comments

Category:

Share: