प्रेम

प्रेमाची संकल्पना असते प्रत्येकाची डिफरंट,
कोण म्हणतं लफडं तर कोण म्हणतं फ्लर्ट

प्रेम म्हणजे नक्की काय हे कळते प्रेम जडल्यावर,
असेच प्रेम जडले त्याचे एका सुंदर मुलीवर

नजरानजर झाली त्यांची, पडला तो तिच्या प्रेमात,
प्रेमाला वय नसतं म्हणुन तर जडले कोवळ्या वयात

मैदानातला लपंडाव, पिकनिक मधली धमाल,
गाण्याच्या भेंड्या, सगळ्यात तिची कमाल

शाळेत तिच्या नावाने सुरुवात झाली चिडवायला,
ते चिडवणं ही लागले होते त्याला आवडायला

शाळेतले ते दिवस गेले सरुन, राहील्या फक्त आठवणी
ते सुंदर क्षण आठवुन मनात किलबिल होते भारी

वार्याची झुळूक हळुवारपणे हलवुन जाते तिच्या बटांना
रेशमी रुमालात लपलेला चेहरा खुलवुन जातो मनाला.

तिच्याबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण जातो हलवुन
त्या आठवणींना आठवुन तो स्वतःला जातो विसरुन

आता तिची सोबत नाही त्याचीच वाटते खंत,
तिच्याशिवाय जीवनात राहिला नाही काही गंध

कधी केले नाही त्याने त्याचे मन मोकळे,
मनातले सांगायला हवे होते तिला आधीच सगळे.

बर्याच काळांनी का होइना त्यांची घडुन आली भेट,
कसलाही विचार न करता तो पोचला त्या ठिकाणी थेट

आज काही करुन मन मोकळं करायचं असा केला विचार
पण तिच्या गळ्यातला तो दागिना पाहुन शब्द ठेवले मनात

कशी वाटली कविता? आपला अभिप्राय जरूर कळवा.

Facebook Comments

Category:

Share: