बटाटा पुरी
बटाटा पुरी हा भारतीय पदार्थ असून बनवण्यास अगदी सोप्पा. उपवासाला आपण नेहमीच साबुदाणा वडा बनवतो पण तेच तेच खाउन प्रत्येकाला कंटाळा येतो म्हणूनच घेऊन येत आहोत “बटाटा पुरी” जी उपवासामध्ये ही खाउ शकतो.
नाव – बटाटा पुरी

साहित्य : (चार व्यक्तींकरता)
गव्हाचे पीठ
4 बटाटे
आलं
8-10 लसणाच्या पाकळ्या
8-10 हिरव्या मिरच्या
हिंग
मोहरी
जिरे
गरम पाणी
तेल
मीठ
कृती :
प्रथम बटाटे उकडून घ्यावे.
परातीत गव्हाचं पीठ घेऊन त्यात 1 चमचा मीठ, जिरे, 2 चमचे तेल टाकावे. पीठ कोमट पाण्याने मळून घ्यावे.
कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यावे त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि हिरव्या मिरचीची ठेचा (आलं , लसूण, हिरव्या मिरच्या पेस्ट) टाकून चांगले परतून घ्यावे. नंतर त्यात उकडलेले बटाटे एक एक करून कुचकरुन टाकावे. चवीपुरते मीठ आणि जिरे पावडर टाकून एकजीव करून घ्यावे. एक मिनिटं नंतर गॅस बंद करून भाजी थंड करून घ्यावी.
मळलेल्या कणकिचे लहान गोळे करून त्यात बटाट्याची भाजी घालून हलकेसे लाटून घ्यावे. (पुरीच्या आकाराचे). गरम तेलात तळून घ्यावे आणि सॉस सोबत गरमागरम बटाटा पुरी सर्व्ह करावी.
आपल्या प्रतिसादाने नवीन काही बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. आपला अभिप्राय जरूर कळवा.
Facebook Comments