ढोकळा

नमस्कार मित्रांनो,

ढोकळा तसा बनवण्यास अगदी सोप्पा. आजकाल बाजारात असे झटपट ढोकळा बनवण्याचे पाकिटं उपलब्ध आहेत पण मी या रेसिपी मध्ये घरगुती बॅटर कसं बनवू शकतो ह्याचा खुलासा करणार आहे.

नाव – ढोकळा

साहित्य : (चार व्यक्तींकरता)

चण्याची डाळ (पाव किलो)
हिरव्या मिरचीचा ठेचा (आलं+लसूण+हिरव्या मिरच्या)
जिरे
मीठ (चवीनुसार)
साखर (2 चमचे)
खाण्याचा सोडा
दही (2 वाट्या)

ढोकळा पीठ बनवण्याची कृती – प्रथम पाव किलो चण्याची डाळ धुवून सहा तास भिजत ठेवावी. सहा तास झाल्यावर त्यात एक वाटी दही घालुन मिक्सर मधुन काढुन घ्यावे. नंतर ते मिश्रण आठ ते नऊ तास आंबवण्यास ठेवावे. नऊ तास झाल्यावर आंबवलेल्या मिश्रणात चवीपुरतं मीठ, दोन चमचे साखर, आलं-लसुण-हिरव्या मिरचीची पेस्ट घालुन मिश्रण एकजीव करावे. तयार करण्याच्या दोन मिंनीटापुर्वी एक चमचा खाण्याचा सोडा घालुन मिश्रण हलवुन घ्यावे.

ढोकळा बनवण्याची कृती – गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करत ठेवावे. एका ताटाला तेल लावुन केलेले मिश्रण ताटात पसरवावे आणि गॅसवरच्या भांड्यात 20-25 मिनीटे झाकुन ठेवावे. वरुन जिरे-मोहरीची फोडणी देऊन बारीक चिरलेली कोथींबीर पेरावी.

आपल्या प्रतिसादाने नवीन काही बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. आपला अभिप्राय जरूर कळवा.

Facebook Comments

Category:

Share: