गोवा ट्रिप

एखाद्या दिवसाची आपण आटुरतेने वाट बघत असतो, आणि तो दिवस आला की जस वाटतं ना, तसच काहीसं मला त्या दिवशी वाटत होतं.

दरवर्षी एकतरी फॅमिली ट्रिप प्लान करायची, हा आमचा अट्टाहासच असतो. त्या निमित्ताने सगळे एकत्र येऊन मस्त धमाल मस्ती करायचा योग येतो. सुरवातीला सगळेच भाग घेतात या प्लानिंगमध्ये, पण मुलांच्या परिक्षा वा इतर काही कारणं देऊन ते सहजरित्या बादही होतात.

गोव्याच्या प्लानचं पण तसचं काहीसं झालं, आम्ही एकुण बाराजणं होतो पण तो काटा सहावर आला आणि वाटलं आता प्लान कॅन्सल होतोय की काय. पण नशिब चांगल म्हणुन जेवढे तयार तेवढ्यांनी जायचं ठरवलं.

गोव्याला जायचं म्हणुन आधीपासुनच सगळी तयारी सुरु. शाॅपिंगसाठी आम्ही क्राॅफर्ड मार्कटला जायचं ठरवलं. मी, दिपाली (मोठी बहिण) आणि सारीका (लहान बहिण) संध्याकाळी 6 च्या दरम्यान मार्केटमध्ये भेटलो. आमची शाॅपिंग काही संपत नव्हती, जिन्स, टाॅप्स, रुद्रसाठी (मुलगा) ड्रेस, विशालसाठी (नवरा) टी-शर्ट, आणि महत्वाचा आमचा गोव्याचा ड्रेसकोड म्हणजे वन पिस असं बरच काही घेऊन 9 ला आम्ही मार्केद सोडलं.

10 मार्च 2016 ते 13 मार्च 2016 या डेट्स ठरल्या होत्या आणि त्याप्रमाणे कोकण-कन्या एक्सप्रेसच रिसर्वेशन केलं होतं. पनवेलला हाॅल्ट होता म्हणुन माझी फॅमिली तिथुनच चढली बाकी सगळे दादरवरुन चढले. सगळेच खुप एक्साइटेड होते कारणच तसं होतं ना गोव्या सारखा प्लान सक्सेसफुल होणं फार कठीण असतं. पण म्हणतात ना थोडं काही चांगलं होत असेल तर त्यानंतर वाईटही होतच ना.

पहिला दिवस

Hanuman Mandir Goa
Hanuman Mandir Goa

11 मार्च ला सकाळी 10 च्या दरम्यान पोचलो. मस्त गरम गरम चहा आणि बटाट्या वड्यावर ताव मारला.  ट्रॅव्हल्सचं बुकींग आधीच झालं होतं आणि मनासारखा ड्रायवरपण भेटला. पण मी आधी म्हटलं त्याप्रमाणे थोडं वाईट ही घडतंच ना.  ज्या हाॅटेल मध्ये बुकींग केलं होतं त्या ठिकणी पाण्याची पाइपलाईन फुटल्या कारणाने आम्हाला दुसर्या हाॅटेलमध्ये शिफ्ट करण्यात आलं.  तसं नवीन हाॅटेल काही वाईट नव्हतं पण या हाॅटलपेक्षा पहिलं हाॅटेल नक्कीच छान असणार पण असो जे होतं ते चांगल्यासाठीच असं म्हणुन आम्ही आमचा प्रवास सुरु केला.  पहिल्या दिवशी आम्ही सगळ्या मंदिरांनाआणि  डोना पौला या लव्हर स्पाॅटला भेट दिली.

मारुती मंदिर हे गोव्यामधील एक अप्रतिम ठिकाण. रेखीव अशी संरचना, पायथ्यापासून पायर्‍यांची रचना, चारही दिशेला हिरवळ आणि मधोमध हे नारंगी रंगाचे उभे असलेले सुंदर मंदिर डोळ्यास दिपवून टाकेल असे त्याचे सौंदर्य.

Dona Paula Goa
             Dona Paula River Scene

गोव्यामधलं सगळ्यात जास्त आवडलेलं ठिकाण म्हणजे डोना पौला.  हे ठिकाण लव्हर्स पाॅइंट म्हणुन ओळखलं जातं आणि खरच त्या जागेत तशीच काहीतरी जादु होती.  म्हणतात की डोना पौला नावाच्या मुलीचे एका फिशरमॅन बरोबर प्रेम होते ते घरच्यांना अमान्य असल्याकारणाने तिने त्या नदीत उडी मारुन जीव दिला आणि त्यामुळे त्या नदीला तिचं नाव देण्यात आलं.

दुसरा दिवस

Chapora Fort Goa
                      Chapora Fort Goa

12 मार्च ला काही बीचेस आणि चापोरा फोर्ट माझं दुसरं आवडतं ठिकाण कवर केलं.  “दिल चाहता है” या मुव्हीचं शुटींग इथे झाल्याचं ऐकलं होतं आणि तसा त्याचा अनुभव त्या ठिकाणी गेल्यावर आला. अक्षरशः आम्ही त्या मुव्ही मधल्या सीनप्रमाणे पोझ देऊन काही फोटोज काढले.  त्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे वनपीस घातला होता.

तिसरा दिवस

Tropical Space Plantation Goa
         Tropical Space Plantation Goa

13 मार्च ला परतीचा प्रवास होता त्यामुळे त्या दिवशी फक्त स्पाइस प्लान्टेशन कवर केलं.  केरी मधलं ट्रॉपिकल स्पाइस प्लॅनटेशन सुद्धा एक अप्रतिम ठिकाण आहे जिथे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारची झाड बघायला मिळाली.  सर्वात सुंदर वाटलं ते म्हणजे तिथे येणार्‍या प्रत्येक पाहूण्याचं स्वागत सांस्कृतिक पद्धतीने म्हणजेच हलद, कुंकू आणि गळ्यात हार घालून केले जाते आणि त्याचबरोबर हर्बलचहा दिला जातो. चहा पिऊन झाल्यावर एक गाइड आपल्यासोबत येतो जो आपल्याला प्रत्येक झाडाचं महत्व पटवून देतो.  लवंग, मिरच्या, कडीपत्ता, काळी मीरे, हे आणि असे बरेच मसाले आपण पहिले आहेत पण त्यांची झाडं पाहण्याचा योग खुपच अद्भुत होता.  त्याच बरोबर काजू, बदाम तसेच ट्रॉपिकल फ्रूट म्हणजे स्टार फ्रूट, जॅक फ्रूट, कस्टर्ड अॅपल, केळी, अननस, पपई अशी बरीच झाडं बघायला मिळाली.सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोटपूजा.  जेवणाची सोय ही अतिशय उत्तम, केळीच्या पानापासून बनवलेल्या ताट आणि वाट्या. जेवण ही दोन्ही प्रकारचे – शाकाहारी आणि मांसाहारी पण सकस असा आहार. ना तेल जास्त ना जास्त मसालेदार.

इतकी धमाल करून पुन्हा परतिचा प्रवास सुरू.

  Food in Tropical Space Plantation
                            Food in Tropical Space Plantation

कसा वाटला माझा अनुभव?  आपला अभिप्राय जरूर कळवा. आपलाही अनुभव तुम्ही खाली दिलेल्या “Comment Box” मध्ये नोंदवू शकता

Facebook Comments

Category:

Share: