मुगाचा शिरा

नैवेद्य म्हणटलं की सगळ्यांना एकच पदार्थ आठवतो तो म्हणजे शिरा. तसे शिर्याचे प्रकार अनेक पण सगळ्यांकडे जो आवर्जून केला जातो तो म्हणजे रव्याचा शिरा. आता म्हणाल की तो तर आम्ही नेहमीच करतो, मी का तुम्हाला माझी रेसेपी शेर करते?, तुमचं अगदी बरोबर आहे! पण मी आज तुम्हाला वेगळ्याच शिर्याचीच रेसिपी सांगणार आहे तो म्हणजे मुगाचा शिरा आहे.

मूग ही अशी डाळ आहे ज्यात जास्त प्रमाणात प्रोटीन दिसून येते म्हणून बर्‍याचदा डॉक्टर्स लहान मुलांपासून म्हातर्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच या डाळीचे सेवन करण्यास सांगतात. माझी पुढची रेसिपी सादर करण्याअगोदर आपण मूग डाळीची वैशिष्ट समजून घेऊ.

वैशिष्ट : 

  1. मूग डाळीत कॅलरीज चे प्रमाण कमी असून फाइबर, आयरन, पोटेशि‍यम, कैल्शियम, विटामिन बी कॉम्प्लेक्स आणि प्रोटीन ह्यांचे प्रमाण जास्त आहे.
  2. शरीरातील कोलेस्ट्रोलचे प्रमाण जास्त झाल्यावर या डाळीचे सेवन केल्यास हे प्रमाण कमी करण्यास नक्की मद्द होते.
  3. आज काल सगळेच जण वजन कमी करण्याच्या मागे लागले आहेत आणि त्यासाठी जिम वा योगा असे माध्यम निवडणं साहजिक आहे पण त्यांना माझा अजुन एक सल्ला आहे, जेवणात या डाळीचा समावेश करा, तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.

Mungdal Sheera

नाव – मुगाचा शिरा

साहित्य : (चार व्यक्तींकरता)

१ कप साजूक तूप
पाव किलो मुगाची डाळ
१ वाटी साखर (आवडीनुसार)
२ कप दूध (उकळलेले)
काजू, बदाम, किसमीस

कृती :

प्रथम पाव किलो मुगाची डाळ खरपूस भाजून घ्यावी. एका

गॅसवर एका कढईमध्ये १ कप तूप गरम करण्यास ठेवावे. (ह्या पदार्थासाठी तूपाचं प्रमाण थोड़ जास्त लागतं ) तूप गरम झाल्यावर त्यात भाजलेली मुगाची डाळ सोडून १० मिनिटे मंद आचेवर हलवत राहावे. आता त्यात २ कप उकळलेले दूध सोडून मिश्रण तोपर्यंत हलवत राहावे जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही आणि तूप वेगळं सुटलेलं दिसत नाही.

मिश्रण घट्ट झाल्यावर त्यात १ वाटी साखर आणि वेलची पावडर घालून मिश्रण पुन्हा एकजीव करावे. वरुन काजू, बदाम आणि किसमीस पेरावे.

आपल्या प्रतिसादाने नवीन काही बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. आपला अभिप्राय जरूर कळवा.

Facebook Comments

Category:

Share: