पाउस

पाउस म्हणजे सात जून. पाउस म्हणजे भजी.
महिन्याअखेरी का होईना पण तू करतोस आगमन भारी.

त्याच्या आगमनाने निसर्ग होतो टवटवीत, झाडे होतात प्रफुल्लित.
माणसाचे मन होते तजेलदार, लहान मोठे सगळेच होतात आनंदित.

अशा वेळेस आठवतात लहानपणीचे ते मजेशीर क्षण.
पाण्यात सोडलेल्या होड्या तर उड्या मारताना झालेले व्रण.

आठवते शाळेच जाताना दप्तरात घातलेल प्लास्टिकच कवर
बाबानी आणलेला नवा कोरा रेनकोट आणि पावसाळी स्लिपर

पण त्याची जागा घेतली बंद ट्रेन आणि साचलेल्या पाण्याने.
आणि हवामान खात्याकडून बातमी येते “जोरात आगमन केले पावसाने”

एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाउन काही घेतात आनंद,
तर काही होतात बेघर तर काहीना नसतो त्यात गंध.

हवाहवासा वाटणार्‍या पावसाने उशिरा का होईना दिली जोरदार हजेरी
पाणी फाउंडेशन ने केलेल्या कामाला त्यातूनच मिळाली शाबासकी.

Facebook Comments

Category:

Share: