रक्षाबंधन
रक्षाबंधन म्हटंल की आठवतात बालपणीचे ते क्षण
बालपणी त्या दिवसासाठी आसुसलेलं असे मनं
आठवड्याभरापासुन उधाण आलं असतं मनाला
दादासाठी एक राखी आणि एक राखी स्वतःला
रंगबेरंगी गोंडे पाकिटात घालुन पाठवायचो मामाच्या गावी
पण आता वाॅट्सअपमुळे मेसेज पाठवुन काम होतं भारी
शाळेत जो हुशार विद्यार्थी तो खरा राखीचा मानकरी
नंतरचा मान मिळेल जो गिफ्ट्स देईल सगळ्यांच्या हाती
दहावी संपली की तो भाऊ होतो अनोळखी आणि
काॅलेज मध्ये पुन्हा ओळख होते नवीन भावाची
काॅलेज मध्ये हेच चित्र दिसुन येईल उलटं
राखी कोणी बांधु नये असा प्रत्येकाचा हट्ट
ऑफिस मध्येही असते प्रत्येकाला त्याचीच भीती
पण मुलीही सावरल्या आहेत परत करत नाही चुकी
आता सख्या भावाला नसतो वेळ बांधुन घ्यायला राखी
कधी वाटतं हे मराठमोळे सण विसरुन जाईल नवी पिढी
Facebook Comments