टोस्टॉटो

आज तुमच्यासाठी एक नवा पदार्थ घेऊन आले आहे, जी माझ्या नवरोबाची क्रियेटिविटी आहे फक्त माझ्या हस्ते तो बनवला गेला. नाव थोड वेगळं आहे पण शरीरास पौष्टिक आणि चटपटींत असा हा पदार्थ. टोस्ट आणि मटकीची उसळ ह्यांच उत्तम एकत्रीकरण.

मोड आलेल्या मटकीचा येथे वापर करणार आहे.  तशी सगळीच कडधान्ये पचण्यास सारखी नसतात. त्यातल्या त्यात मटकी ही पचण्यास हलकी आणि त्यानंतर मूग व चवळी. मोड न आलेली कडधान्ये पचण्यास जड असतात आणि त्यामुळे पचनक्रिया नीट होत नाही त्याचा परिणाम पोट जड होते. चला तर मग मोड आलेल्या मटकिचे महत्त्व समजून घेऊ.

वैशिष्ट

  1. मोड आणल्यामुळे कडधान्यांचा वातुळपणा कमी होतो.
  2. मोड आलेली कडधान्ये बर्‍याच काळानंतर सुकून गेल्यास थोडया वेळ पाण्यात टाकून ठेवा, पुन्हा टवटवीत होण्यास मदत होते. अशी कडधान्ये प्रथिने, कर्बोदके आणि जीवनसत्वांनी परिपूर्ण असतात.
  3. केसांच्या गळण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये विटामिन-सी ची मात्रता असल्यामुळे याचे सेवन दररोज केल्यास केस गळण्याच्या त्रासातून नक्की सुटका होईल.
  4. उपाशी पोटी अशा मोड आलेल्या कडधान्यांचे सेवन केल्यास वजन कमी करण्यास ही मदत होते.

नाव – टॉस्टेको

साहित्य : (चार व्यक्तींकरता)

टोस्ट ( 1 पाकीट – 20 टोस्ट)
2 वाट्या मटकी (मोड आले असतील तर उत्तम)
1 टोमॅटो
1 कांदा
1 चमचा लाल तिखट
अर्धा चमचा हळद
1 चमचा गरम मसाला
चवीपूरत मीठ
2 चमचे तेल
जिरे
मोहरी
कोथिंबीर
100 ग्रॅम दही
सॉस

कृती : 

प्रथम कढईत तेल टाकून जीरे-मोहरी, कांदा, लसुण व टोमॅटो टाकून चांगले परतवून घेणे. चांगले शिजल्यावर त्यात आवडीनुसार तिखट, हळद घालून परतवून घेणे. सगळे मसाले एकजीव झाल्यावर त्यात मोड आलेली मटकी टाकून मंद आचेवर शिजू द्यावे. (आवश्यकतेनुसार पाणी टाकावे) नंतर त्यात चवीपूरत मीठ आणि गरम मसाला पावडर घालावी व एक उकळी आणावी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून उतरावे.

डिश सजावट – एका प्लेटमद्ये 2 टोस्ट घ्यावे. त्यावर मटकीची उसळ टाकून वरुन बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकावी. आणि वरुन थोड दही आणि सॉस टाकून डिश सर्व्ह करावी.

आपल्या प्रतिसादाने नवीन काही बनवण्यास प्रोत्साहन मिळतो. आपला अभिप्राय जरूर कळवा.

Facebook Comments

Category:

Share: